भारतामध्ये जेरियाट्रिक केअर

जेरियाट्रिक केअर

भारतामध्ये जेरियाट्रिक केअर - जेरियाट्रिकमेडिसिन - कडे लक्ष देणे काआवश्यकआहे?

ज्यांनी एके काळी आपली काळजी घेतली त्यांची काळजी घेणे हा सर्वोच्च सन्मान आहे.

संयुक्तराष्ट्राच्या (United Nations) एका नवीन अहवालानुसार, भारतातील वृद्धलोकांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा अहवाल जुलै २०२२ साली प्रसिद्ध झाला, या नुसार भारतामध्ये ६० वर्षे आणि त्यावरील वयाचे 14.9 कोटी व्यक्ती आहेत. हि संख्या देशाच्या एकूण लोक संख्येच्या सुमारे 10.5% आहे. हि संख्या 2036 पर्यंतसुमारे 15% ( 22.7कोटी) एवढी वाढण्याचा अनुमान  आहे. त्यावेळी दर ५ व्यक्तीं पैकी १ व्यक्तीवृद्ध असेल.

“वृद्धांचेवृद्धत्व” नावाच्या अहवालाचा अंदाज दर्शवितो की 2022 ते 2050 मध्ये भारताची लोकसंख्या 18% टक्क्याने वाढेल, तर त्याच कालावधी मध्ये वृद्ध लोकांची संख्या 134% टक्क्याने वाढलेली असेल. त्याचकाळात 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची लोक संख्या २७९% टक्क्याने वाढेल. निःसंशयपणे, आजचा तरुण भारत येत्या काही दशकांत वेगाने वृद्ध होत जाणारा समाज बनणारआहे, या कडे लक्ष वेधणे खूप जरुरी आहे.

भारतातील वृद्ध लोक संख्येची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन ती अभ्यासाने गरजेचे आहे. सर्व वृद्ध लोक संख्ये पैकी, दोन तृतीयांश लोक खेड्यांमध्ये राहतात आणि जवळपास निम्म्या लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती खराब आहे. अर्ध्याहून अधिक भारतीय वृद्ध दैनंदिन जीवनासाठी आश्रित/दुसऱ्यावर अवलंबून (dependent) आहेत, त्यामध्ये बहुतेक वृद्ध-महिला आहेत.

अलीकडच्या काळा मधील काही संशोधन पर निबंधांचे अवलोकन केल्यास असे दिसते कि भारतामध्ये वृद्धांचे भौतिक शोषण, आर्थिक वंचितता, मालमत्ता हडप करणे, वृद्धांना सोडून देणे, त्यांचा शाब्दिक अपमान, भावनिक आणि मानसिक यातना देणेयाचे प्रमाण वाढलेले आहे. या सर्वांचा दुष्परिणाम वृद्धांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

वृध्दापकाळामध्ये आढळून येणाऱ्या(खाली नमूद केलेल्या)आजारांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. परंतु या आजारांचात्या व्यक्तीवर, कुटुंबावर आणि एकूण समाजावर फार मोठा भार कळत नकळत होताना दिसतो.

स्मृतीभंश (Dementia) सारखी अक्षम्य व्याधी, थरथरी (tremors), थकवेपणा (fatigue), लघवीवर नियंत्रण नसणे (urinary incontinence), हाडांचा ठिसूळ पणा (Osteoporosis), तोल जाणे (Falls), ब्लडप्रेशर (कमी/जास्त) (Hypotension/Hypertension) ,स्नायू कमकुवत होणे (Sarcopenia), संधि वात (Joint pain) त्याच सोबत नैराश्य पणा (Depression/डिप्रेशन) आणि झोपेच्या व्याधी (Insomnia, Sleep Apnea) या सारखे एक किंवा एकाचवेळी २-३ आजार वृद्धवस्थेत उद्भवण्याची प्रमाण जास्त दिसते.

वयो माना नुसार व्याधींचे विश्लेषण [” An analysis of morbidity patterns by age”] हा स्टडी पेपर स्पष्ट पणे सूचित करतो की वृद्धांना विविध व्याधीं एकाच वेळी होण्याची शक्यता अधिक असते. 60 वर्षां पेक्षा जास्त वयाचे लोक हा अतिशय विषम असा लोक संख्येचा घटक आहे.

ज्यांच्या मध्ये तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती सापडेल जी मॅरेथॉन धावू शकते तिथेच त्याच वयाचे व्हील चेअर वर बांधलेल गेलेले लोक सुद्धा दिसतील.

एकीकडे तुम्हाला बुद्धीने आणि विचाराने तल्लख व्यक्ती आढळून येतील तिथेच दुसरीकडे त्याच वयोगटातील स्मृतीभ्रंश/स्मरणशक्ती क्षीण झालेलेहि आढळतील. काहीजण आर्थिक, दैनंदिन जीवनासाठी पूर्णपणे अवलंबून दिसतील आणि काही दोन्ही बाबतीत स्वतंत्रपणे जीवन जगताना दिसतील.आणि म्हणूनच या वयोगटाला एकाच साच्या मधून बघणे, आणि त्यावरून मत मतांतरे/पॉलिसि ठरवणे अगदी चुकीचे ठरेल.

वयवादी वृत्तीचे विघटन करणे आणि वयोवृद्ध माणसा बद्दल किंवा समाजातीलत्या दुर्बल घटका विषयीची प्रत्यक्षात खरी नसणारी ठराविक कल्पना (stereotype); साचेबंद समज – याविषयावर मंथन होणे आणि ते अपसमज कमी करण्यासाठी उपाय-योजना करणे हि काळाची गरज आहे.

लोकसंख्येतील यामोठ्या गटाकडील दुर्लक्षित अवस्था, वयोमान, वाढलेल्या वयोमाना मुळे होणारे विविध शारीरिक आणि मानसिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्न; यासगळ्यांचा विचार करता यासाठी आरोग्य व्यवस्थेमध्ये वेगळी शाखा असणे अपरिहार्य वाटल्यामुळे जेरियाट्रिक मेडिसिन या शाखेचा उगम झाला.

खऱ्या आयुष्यातील एक उदाहरण - मथुरा बाईचा संघर्ष

मथुराबाई या ७३ वर्षाच्या आजी गावाकडे राहत. त्यांचा एक मुलगा शिक्षक म्हणून तो नजीकच्या तालुक्याला राहायला गेलेला, एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन पुण्याला शिफ्ट झाला. शेती करणारा मोठा मुलगा म्हणून त्या त्याच्या कडे गावीच राहत. नवऱ्याचा आधार ३ वर्षांपूर्वी गमावला. आता गुडघे दुखी (अर्थराइटिस/Arthritis) मुळे फारसं काम होत नाही आणि उठणं बसणं कठीण होऊन बसलं. लघवीवरचं नियंत्रण कमी झाल्यामुळे (युरिनरीइंकाँटिनन्स/Urinary Incontinence)  त्या घर जास्त सोडत नव्हत्या. एकटेपणा (लोनलीनेस/Loneliness) वाढत जाऊन कधी नैराश्याने (डिप्रेशन/Depression)  जागा घेतली हे कळलं नाही. लोकांशी संवाद कमी झाला आणि मथुराबाई अंथरुणाला खिळल्या.

अशी अनेक उदाहरणे आपण अवती भोवती पाहतो. याचा सखोल अभ्यास करण्याच्या हेतूनेच जेरियाट्रिक मेडिसिन याशाखेची अत्यंत गरज आहे.जेरियाट्रिक केअर वृद्धप्रौढांच्या अनन्य गरजांनुसार त्याला साजेशा आणि अनुरूप वैद्यकीय, शारीरिक, मानसिक प्रश्नावर आधारित सेवा पुरवते. यामध्ये नियमित तपासणी, वृद्धांचे लसीकरण, दीर्घकालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक काळजी यांचा समावेश होतो. जेरियाट्रिकीमेडिसिनस्पेशालिस्टहेवृद्धांच्याआरोग्याबाबद्दलकिंबहुनाआयुष्याबाबद्दलसर्वांगीणदृष्टीकोनप्रदानकरूशकतात, शारीरिकआणिमानसिकदोन्हीकल्याणावरलक्षकेंद्रितकरतात.

भारतामधील वृद्ध लोकांची झपाट्याने वाढणारी संख्या, मथुराबाई सारख्या असंख्यक हाण्या, देशात सुधारित जेरियाट्रिक केअर सुविधांची गरज अधोरेखित करते. विशेष आरोग्यसेवा, संज्ञानात्मक समर्थन (cognitive support) आणि सामाजिक प्रति बद्धता (social engagement) हे वृद्ध आणि त्यांचे आयुष्य समृद्ध करण्याचे आवश्यक घटक आहेत.

वृद्धावस्थेला सकारत्मक आणि परिपूर्ण जीवनाचा टप्पा बनवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करून, भारत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यदायी, गुणात्मकजीवन सुनिश्चित करू शकतो, याचा संपूर्ण समाजाला फायदा होईल. भारताने वृद्धांच्या काळजीला प्राधान्य देण्याची आणि वृद्धलोक संख्येला सन्माननीय जीवन प्रदान करण्याची वेळ आली आहे.

वृद्धांना भेड सावणाऱ्या काही विशिष्ट महत्वाच्या आजारांवर येत्या पुढच्या काळात आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत, यामध्ये सृतीभंश (डिमेन्शिया/Dementia), लघवी वरील नियंत्रण कमी होणे (युरिनरीइंकाँटिनन्स/Urinary  incontinence ), नैराश्यवाद (डिप्रेशन/Depression), तोलजाणे (Falls), इत्यादींचा समावेश आहे. तुम्हालाही वृद्धलोंकांच्या आरोग्यसंबंधित काही प्रश्न असतील तर संपर्क करू शकता.

ज्यांनीएकेकाळीआपलीकाळजीघेतलीत्यांचीकाळजीघेणेहासर्वोच्चसन्मानआहे.